जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२३ । उद्या २९ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद या निमित्त जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी भरणारे आठवडे बाजार भरणार नसल्याचे प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार उद्या शुक्रवारी यावल येथे भरणारा आठवडे बाजारात बंद ठेवण्यात आला आहे.
आज गुरुवारी अनंत चतुदर्शी आणि उद्या शुक्रवारी २९ सप्टेंबर शुक्रवार रोजी मुस्लीम बांधवांचे ईद-ए-मिलाद हे सण आहे. या निमित्ताने जिल्ह्यात मिरवणुका निघत असल्याने या पार्श्वभुमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू याकरीता जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी भरणारे आठवडे बाजार भरणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
शुक्रवार या दिवशी येणारे आठवडे बाजार सोयीचे दिवशी भरवावेत असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आदेश असल्याने यावल येथील शुक्रवारी भरणारा आठवडे बाजार शनिवारी भरविण्यात येणार असल्याचे तहसीलदार तथा दंडाधिकारी मोहन माला नाझीरकर यांचे आदेशान्वये मुख्याधिकारी हेमंत निकम शनिवारी भरविण्याबाबत दवंडी प्रसारित करण्यात येत आहे.
त्यामुळे यावल तालुक्यातुन व पारिसरातुन तसेच विविध गावातुन आपले माल विक्रीस येणारे शेतकरी व जिवनावश्यक वस्तुची विक्रीसाठी येणारे व्यापारी यांनी याची नोंद घ्यावी,यावल येथे नियमित भरणारे शुक्रवारचे आठवडे बाजार हे ईद-ए-मिलादच्या मिरवणुकी मुळे शुक्रवार ऐवजी शनिवारी भरणार असल्याचे मुख्याधिकारी हेमंत निकम यांनी कळविले आहे. तरी परिसरातील व्यापारी व शेतकरी यांनी यावल येथील शुक्रवारच्या दिवसी भाजीपाला व ईतर जिवनावश्यक वस्तुंच्या विक्रीसाठी येवु नये असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत आहे