टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने पदकाचे खाते उघडले

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२१ । टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने पदकाचे खाते उघडले आहे. देशाला पहिले पदक एका महिलेने जिंकून दिले. वेटलिफ्टिंगमध्ये ४९ किलो वजनी गटात भारताच्या मीराबाई चानूने रौप्यपदक जिंकून दिले. 

मीराबाईने एकूण २०२ किलो वजन उचलले. या प्रकारात चीनच्या होउ झीहुईने सुवर्णपदक जिंकले. तर इंडोनेशियाच्या विंडी असाहने कास्यपदक जिंकले. 

मीराबाईला गेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये अपयश आले होते. त्यानंतर तिच्यावर टीका देखील झाली होती. पण गेल्या चार वर्षात मीराबाईने कठोर मेहनत घेतली आणि त्याचे यश आज टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिळाले.