⁠ 
सोमवार, डिसेंबर 2, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ विभागात आज ९ तासांचा मेगा ब्लॉक, २२ रेल्वे गाड्यांवर होणार परिणाम

भुसावळ विभागात आज ९ तासांचा मेगा ब्लॉक, २२ रेल्वे गाड्यांवर होणार परिणाम

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जानेवारी २०२२ । मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाद्वारे जळगाव-भुसावळ दरम्यान चौथ्या लाईनवरील रेल्वे पुलावर गर्डर टाकण्यात येणार आहे. तसेच बऱ्हाणपूर स्टेशन येथे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग पॅनलचे कार्य केले जात आहे. त्यामुळे आज दि.१२ जानेवारीला ९ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मेगा ब्लॉकचा परिणाम रेल्वेगाड्यांवर होणार असून, भुसावळ इगतपुरी मेमु रद्द करण्यात आली आहे. तसेच अप-डाऊन साईडच्या २२ गाड्या मार्गात असलेल्या स्टेशनवर थांबविण्यात येणार आहेत. त्यामुळे त्या गाड्या विलंबाने धावण्याची शक्यता आहे.

या गाड्यांवर होणार परिणाम

डाऊन मार्गावर १२८३३ अहमदाबाद हावडा एक्सप्रेस, १९४८३ अहमदाबाद बरोनी एक्सप्रेस २०१०३ गोरखपूर एक्सप्रेस जळगाव स्टेशन गीतांजली म्हसावद स्टेशन, १२७७९ १२८५९ येथे थांबेल. गोवा एक्सप्रेस माहेजी स्टेशन येथे थांबेल. २०८२४ अजमेर पुरी एक्सप्रेस धरणगाव स्टेशन येथे थांबेल. १५०१७ काशी एक्सप्रेस पाचोरा येथे, १५४४८ लोकमान्य टिळक टर्मिनस जयनगर गाळन स्टेशन, १५६४५ लोकमान्य टिळक टर्मिनस गुवाहाटी एक्स्प्रेस कजगाव स्टेशन येथे थांबेल. १२५३४ पुष्पक एक्सप्रेस वाघळी स्टेशनला थांबेल.

author avatar
Tushar Bhambare