जळगावात आज वादळी पावसाची शक्यता, IMD कडून येलो अलर्ट जारी

ऑगस्ट 7, 2026 9:30 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर जळगाव जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतलीय. काही दिवसापासून ढगाळ वातावरण असून अधून मधून जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळत आहे. दरम्यान, हवामान खात्याने जळगावात वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

rain 2

हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात. तसेच जळगाव जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, मध्य महाराष्ट्रातील उर्वरित जिल्हे तसेच मराठवाड्यात अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. दिवसभर ऊन-सावल्यांचा खेळ पाहायला मिळेल, तर काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडू शकतात.

जळगावात आज पावसाचा अलर्ट

आज जळगाव जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून आगामी दोन तीन दिवस जिल्ह्याचे कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ ते २५ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण अधिक राहणार असल्याने नागरिकांना दमट वातावरणाचा अनुभव येईल. तसेच पश्चिम ते नैऋत्य दिशेकडून मध्यम वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now