जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२५ । गेल्या आठवड्यात चांदीच्या किमतीत मोठी उसळी दिसून आली. सोनेही वधारले असून सोन्याचे दर जवळपास १ लाख रुपये झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सोने खरेदी करणे परवडत नाही. दरम्यान आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर पुन्हा वाढले आहेत. तर चांदीच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही.

काय आहे सोने चांदीचा दर?
आज सोन्याच्या दरात प्रति तोळा १७० रुपयांनी वाढ झाली आहे. यांनतर १ तोळा २४ कॅरेट सोन्याचे दर ९९,८८० रुपये आहेत. २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचे दर ९१,५५० रुपये झाले आहेत. तर आज चांदीचे दर स्थिर आहे.. आज एक किलोचा चांदीचा दर ११५००० रुपये इतका आहे.

जळगाव चांदीने मोडले रेकॉर्ड
दरम्यान, गेल्या आठवड्यात जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात मोठी वाढ झाली असून चांदीचे दर विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहे. गेल्या आठवड्यात चांदी ५ हजारांनी महागली आहे.तर सोने १ हजार रुपयांनी महागले. जळगावात चांदीचा दर सध्या जीएसटीसह १ लाख १६ हजार ३९० रुपयांवर पोहोचले आहे. सराफा बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच चांदीच्या दराने 1 लाख 16 हजारांचा आकडा पार केला. या दरवाढीचे नेमके कारण स्पष्ट होत नसले तरी वायदा बाजारातील (कमोडिटी मार्केट) नफेखोरी असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.












