बाबो..! 24 तासात चांदीत 3000 रुपयांची वाढ, सोनेही महागले, आताचे दर वाचून फुटेल घाम?

सप्टेंबर 13, 2025 10:14 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२५ । जागतिक स्तरावरील मागणी वाढल्याने आणि पुढील आठवड्यात अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपात होण्याची अपेक्षा वाढल्याने सराफ बाजारात सोन्यासह चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदवली गेल्याने पुन्हा नवा उच्चांक केला. Gold Silver Rate Today

gs13

मागच्या काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या किमती दररोज नवीन उच्चांक प्रस्थापित करताना दिसत आहेत. यातच काल शुक्रवारी एकाच दिवसात चांदीच्या भावात तब्बल ३००० रुपयांची वाढ झाली. यामुळे आता चांदी जीएसटीसह १, ३२,००० रुपये प्रति किलो या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली. तर शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव शुक्रवारी ७०० रुपयांनी वाढून जीएसटीसह १,१३,३०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला, जो त्याचा सर्वकालीन उच्चांक आहे.

चालू कॅलेंडर वर्षात सोन्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅम ३५ हजार रुपयांपर्यंतची वाढ झाली आहे. ३१ डिसेंबर २०२४ रोजी ती ७८,९५० रुपये प्रति १० ग्रॅम इतकी होती. सध्या सोन्याच्या किमतीने घेतलेली मोठी उसळी ही अमेरिकेतील व्याजदर कपातीच्या अपेक्षांमुळे आहे. १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत फेडरल रिझर्व्ह व्याजदरात ०.२५ टक्क्यांची कपात करू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. अमेरिकेच्या कामगार बाजारातून येणारे कमकुवत संकेत या निर्णयाला आधार देत आहेत.

दरम्यान, सोने आणि चांदी सर्वकालीन उच्चांकावर पोहोचल्याचे लक्षात घेता ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली. लग्न सोहळे तसेच सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोने खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांच्या आर्थिक बजेटवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now