उडाण दिव्यांग प्रशिक्षण केंद्राच्या दिव्यांग बालकांनी प्रज्वलित केले ११५१ दिवे
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑक्टोबर २०२२ । शहरातील रुशील मल्टीपर्पज फाऊंडेशन संचालित उडाण दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील दिवाळी पूर्वसंध्या साजरी करण्यात आली. यावेळी उडाण संस्थेतील दिव्यांग बालकांच्या हस्ते चिमुकले श्रीराम मंदिरात ११५१ दिवे प्रज्वलित करण्यात आले.
जळगाव शहरात दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या रुशील मल्टीपर्पज फाऊंडेशन संचालित उडाण दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातर्फे दरवर्षी चिमुकले श्रीराम मंदिरात दिवाळी पूर्वसंध्या साजरी करण्यात येते. रविवारी दिव्यांग मुले तयार करीत असलेले ११५१ दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला.
सुरुवातीला प्रभू श्रीरामचंद्राची आरती केल्यानंतर गादीपती दादा महाराज जोशी, विनोद बियाणी, गोपाल कासट, उडाणच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाला सुरुवात झाली. प्रसंगी जयश्री पटेल, सोनाली भोई, महेंद्र पाटील, हरचंद महाजन, चेतन वाणी, वैष्णवी तळेले, हेतल पाटील, अनिता पाटील, नितीन भोई आदींसह सर्व दिव्यांग विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
पहा व्हिडिओ
https://youtu.be/Wucn75iEzQ4