जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२४ । राज्यावरील अवकाळी पावसाचे सावट कायम असून हवामान खात्याने आजची राज्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील दोन दिवस सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात आज रविवारी ढगाळ वातावरणासह वादळी पावसाची शक्यता ‘आयएमडी’ने वर्तविली आहे
मागील काही दिवसात जळगावात उन्हाचा पारा ४२ अंशापुढे गेल्याने उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला असून तापमानाच्या तडाख्याने जळगावकर हैराण झाला. मात्र जळगावकर शनिवारी काहीसे सुखावले. तापमानाचा पारा ४२ अंशावर घसरल्याने आणि वाऱ्यामुळे शनिवार जळगावकरांसाठी फारसा ‘ताप’दायी ठरला नाही. दरम्यान, रविवारी ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता ‘आयएमडी’ने वर्तविली आहे
आज राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता:
हवामान खात्याने आज आज मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नगर, पुणे, नाशिक, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
जळगावात पुढील पाच दिवस असा आहे अंदाज?
आज २१ रोजी किमान तापमान २६ तर कमाल तापमान ४२ अंशापर्यंत राहण्याची शक्यता तसेच पावसाची शक्यता आहे.
२२ एप्रिल रोजी किमान तापमान २६ तर कमाल तापमान ४१ अंशावर, वातावरण ढगाळ राहू शकते.
२३ एप्रिल रोजी किमान तापमान २७ तर कमाल तापमान ४२ अंशापर्यंत , वातावरण ढगाळ
२४ एप्रिल रोजी किमान तापमान २७ तर कमाल तापमान ४२ अंशापर्यंत , वातावरण ढगाळ
२५ एप्रिल रोजी किमान तापमान २८ तर कमाल तापमान ४३ अंशापर्यंत , वातावरण ढगाळ