जळगाव जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस; पिकांचे मोठं नुकसान
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२४ । मागील तीन चार दिवसाच्या विश्रांतीनंतर जळगाव जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. यादरम्यान जिल्ह्यातील काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सध्या राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. यामुळे राज्यातील विविध भागात पाऊस कोसळत आहे. जळगाव जिल्ह्यात देखील आज पहाटे पावसाने हजेरी लावली.
यादरम्यान जळगाव तालुक्यातील भोकर, पिंप्राळा, आसोदा, नशिराबाद व इतर महसूल मंडळात अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. चोपडा तालुक्यात देखील ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेती व पिकांचे प्रचंड नुकसान झाले. तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, हवामान खात्याने महाराष्ट्रासाठी पुढील ५ दिवस जिल्हास्तरीय पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्याला आजपासून तीन दिवस १६ जुलैपर्यंत पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे