गुन्हेजळगाव जिल्हामुक्ताईनगर

व्याघ्र अधिवास क्षेत्रात वनरक्षकावर दगडफेक; गुन्हा दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील व्याघ्र अधिवासक्षेत्रात रानडुकराच्या शिकारीच्या उद्देशाने फिरणाऱ्या पारध्याकडुन चक्क व्याघ्र प्रगणना करीत असणाऱ्या वनरक्षकावर दगडफेक करण्यात आल्याची घटना २० रोजी सकाळी ८:३० वाजता कं.नं.५६१ मध्ये घडली. दरम्यान, वनरक्षकाच्या हाताला जबर दुखापत झाली असून या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांत आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

वडोदा वनक्षेत्रातील नियतक्षेत्र वडोदा पुर्व कं.नं.५६१ मध्ये वनरक्षक ज्ञानोबा मोहन धुळगंडे नियमित गस्तीवर असताना सोबतच अखिल भारतीय व्याघ्र प्रगणना अंतर्गत मासभक्षी प्राणी प्रगणना करीत असतांना हलरखेडा येथील रहीम पवार हा फासेपारधी रानटी डुकराची शिकार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लहान बाॅम्बगोळे घेऊन फिरताना आढळून येतात वनरक्षक ज्ञानोबा धुळगंडे यांनी त्यास हटकले असता पवार याने दगड फेक केली.या दगडफेकीत वनरक्षक यांच्या डाव्या हाताला जबर मार लागला आहे.

दरम्यान धुळगंडे यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिसांत आरोपी पवार विरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबाबत तसेच इतर वेगवेगळ्या कलमांबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढीरव तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक परवीन तडवी, कुऱ्हा पोलीस चौकीचे साहाय्यक फौजदार माणिक निकम, पोलीस नाईक हरीश गवळी, पोलीस शिपाई संजय लाटे, राहुल नावकर व संजय लाटे आदी करीत आहे.

हे देखील वाचा :

Related Articles

Back to top button