जळगाव भाजपला तीन नवे जिल्हाध्यक्ष

जुलै 19, 2023 10:37 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२३ । आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून राज्यातील ७० जिल्हाध्यक्षांचे नाव नुकतीच जाहीर केले. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात तीन जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर केली असून यात तरूण चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे.

bjp new jilhadhyaksh jpg webp

यांची झाली निवड?
भाजपने जळगाव जिल्ह्यात तीन जिल्हाध्यक्ष जाहीर केले असून यात रावेर लोकसभेच्या जिल्हाध्यक्षपदी अमोल हरीभाऊ जावळे, जळगाव लोकसभेच्या जिल्हाध्यक्षपदी ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकर तर जळगाव महानगराध्यक्षपदी नगरसेविका उज्वला बेंडाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही निवड जाहीर केली आहे.

भारतीय जनता पक्षाने पक्षाध्यक्षपदांसाठी तरूण चेहर्‍यांना संधी दिली आहे. अमोल हरीभाऊ जावळे यांना आधी विधानसभा क्षेत्रप्रमुखपदावर नियुक्त करण्यात आले होते. याच्या पाठोपाठ त्यांना जिल्हाध्यक्ष करण्यात आले आहे. ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकर हे पक्षाचे फायरब्रँड नेते असून त्यांना बढती मिळालेली आहे. तर जळगाव महानगराध्यक्षपदावर उज्वला बेंडाळे यांच्या माध्यमातून महिलेस संधी देण्यात आलेली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories