⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | शरद पवारांच्या जळगाव जिल्ह्यात तीन सभा होणार ; कुठे आणि कधी??

शरद पवारांच्या जळगाव जिल्ह्यात तीन सभा होणार ; कुठे आणि कधी??

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२४ । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून लोकसभेच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या प्रचारसभा सुरु आहे. यातच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी खासदार शरद पवार हे पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

३ मे रोजी जिल्ह्यात त्यांच्या तीन सभा होणार आहेत. सकाळी १०.३० वाजता त्यांचे जळगाव विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते ११.३० ते १ वाजेदरम्यान चोपडा येथे सभेला उपस्थित राहतील. दुपारी ३ ते ४.३० वाजेदरम्यान भुसावळ येथे सभा घेतील. त्यानंतर सायंकाळी ६ ते ८ वाजेदरम्यान मुक्ताईनगर शहरात सभा घेतील. ते या दिवशी रात्री जळगावात मुक्कामाला थांबणार आहेत.

जिल्ह्याचे राजकारण तापणार…
जळगाव व रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघांत उद्या म्हणजेच २९ रोजी माघारीनंतर लढतींचे चित्र स्पष्ट होणार असल्यामुळे आता खऱ्या अर्थाने प्रचाराला जोर चढणार असून, भारतीय जनता पक्ष, उद्धवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटासह, शिंदेसेना आणि वंचित बहुजन आघाडीचे स्टार प्रचारक आता जिल्ह्यात येणार आहेत. भाजपच्या दोन्ही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी जळगावात पायधूळ झाडून गेले. महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करताना उद्धवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. आणखी काही मोठे नेते जिल्ह्यात प्रचारसभा घेणार असल्यामुळे राजकीय वातावरण तापणार आहे

जिल्ह्यातीलच प्रमुख नेत्यांवर मुख्य जबाबदारी
महाविकास आघाडी व महायुतीकडून प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यातील नेत्यांवरच प्रचाराचा भार राहणार आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील हे महायुतीचे स्टार प्रचारक आहेत. त्यामुळे त्यांच्याही सभा जिल्ह्यात होणार आहेत. महाविकास आघाडीकडून डॉ. सतीश पाटील, उन्मेष पाटील, अरुणभाई गुजराथी व संजय सावंत यांच्याही सभा होणार आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.