वेगवेगळ्या घटनेत तिघांचा मृत्यू

सप्टेंबर 12, 2021 11:32 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ सप्टेंबर २०२१ । एरंडोल येथून जवळपास चार किलोमीटर अंतरावरील मसावद रस्त्यालगतच्या उमर्दे येथे १० सप्टेंबर २१ रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास निलेश पांडुरंग पाटील वय तीस वर्ष या युवकाने राहत्या घरात पुढच्या खोली मध्ये छताच्या लोखंडी कडी ला वायरची दोरी बांधून गळफास घेतला.

crime

पिंपरी बुद्रुक येथे दिव्या संजय पाटील वय सोळा वर्ष या शाळकरी मुलीला घरी विष बाधा झाल्याने तिला उपचारार्थ जळगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान तिचा ९ सप्टेंबर २१ रोजी सकाळी साडेसहा वाजता मृत्यू झाला याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला कागदपत्र प्राप्त झाल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विखरण येथे अशोक जगन पाटील वय ४० वर्षे या इसमाने सहा सप्टेंबर २१ रोजी रात्री विषारी पदार्थ सेवन केल्याने त्यांना जळगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असता १०सप्टेंबर रोजी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या अनैसर्गिक मृत्यूच्या घटनांबाबत पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र पाटील श्री राम पाटील काशिनाथ पाटील अखिल मुजावर संदीप सातपुते राजेश पाटील पंकज पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now