Jalgaon : गॅस गोदामांवर डल्ला मारणारी टोळी गजाआड; १५७ सिलिंडरसह ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

एप्रिल 29, 2026 4:39 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२६ । जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गॅस एजन्सीच्या गोदामांना लक्ष्य करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन अट्टल चोरांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून ४ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

cylindertheft

शेख बिलाल शेख नबी (31, कासोदा, ता.एरंडोल), वसीम खान शब्बीर खान (31, तांबापूरा, जि.जळगाव) व चेतन सुरेश काळे (38, नशिराबाद) असं अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फैजपूर शहराजवळील पिंपरुड रोड परिसरातील ‘श्रीधर गॅस एजन्सी’च्या गोदामात चोरट्यांनी २४ एप्रिलच्या मध्यरात्री ३ लाख ११ हजार ८०० रुपये किमतीचे भरलेले १०० सिलिंडर लांबवल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी ललित रघुनाथ राणे यांनी फैजपूर पोलिसात तक्रार दिली होती. तर वरणगाव शहरातील नरेंद्र उत्तमराव अहिरे (51) यांच्या गॅस गोदामातून २६ फेब्रुवारी २०२६ रोजी चोरट्यांनी ७२ हजार ८४६ रुपये किंमतीचे ५७ सिलिंडर लांबवले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल होता.

दोन्ही गुन्ह्यांची उकल करीत १५७ सिलिंडर पोलिसांनी जप्त केले असून त्यात भारत गॅसचे ६२ भरलेले व भारत गॅस कंपनीचे ९५ खाली सिलिंडरचा समावेश आहे. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले सुझूकी गाडी (एम.एच.19 ईयु 8871) देखील जप्त करण्यात आली असून आरोपींना फैजपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

यांनी केली कारवाई?
ही कारवाई जळगाव अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक, संदीप गावीत, उपअधीक्षक अनिल बडगुजर, भुसावळ उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, हवालदार प्रीतम पाटील, प्रेमचंद सपकाळे, सलीम तडवी, उमाकांत पाटील, यशंवत टहाकळे, श्रीकृष्ण देशमुख, बबन पाटील, सचिन घुगे, प्रदीप सपकाळे, मयुर निकम आदींच्या पथकाने केली. तांत्रीक मदत गौरव पाटील व मिलिंद जाधव यांनी केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now