वर्ल्ड कपचा थरार जळगावकर अनुभवणार एलईडी स्क्रीनवर

मार्च 8, 2026 9:15 AM

आमदार सुरेश भोळे व युवाशक्ती फाउंडेशनतर्फे सामन्याचे थेट प्रक्षेपण ; काव्यरत्नावली चौक येथे भव्य आयोजन

जळगाव लाईव्ह न्यूज । २०-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची अंतिम लढत भारत – न्यूझीलंड या संघांत होणार असून या लढतीचा थरार जळगावकरांना मोठ्या पडद्यावर देखील पाहावयास मिळणार आहे. आमदार सुरेश भोळे, युवाशक्ती फाउंडेशन व शौर्यवीर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विज्ञानाने या अंतिम लढतीचे थेट प्रक्षेपण काव्यरत्नावली चौक येथे दाखविले जाणार आहे. तिरंगा ध्वज, सेल्फी पॉइंट, डिस्को जॉकी, आदी व्यवस्था करण्यात आली आहे.

T20 world

देशात सध्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची धूम असून या स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड या संघात होणार आहे. त्यामुळे या अंतिम सामन्याची उत्सुकता सर्व क्रिकेटप्रेमींना लागली आहे. हा ऐतिहासिक क्षण मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी जळगाव शहरातील युवाशक्ती फाउंडेशन तर्फे रविवार, दि. 8 मार्च रोजी सायंकाळी 7.00 वाजेपासून अंतिम सामना 10 बाय 20 फूट अशा मोठ्या एल.ई.डी. स्क्रीनवर नागरिकांना दाखवण्याची व्यवस्था केली आहे.

प्रवेश सर्वांसाठी खुला असून सामन्याचा आनंद घेताना क्रिकेटप्रेमींना डीजेवरील गाण्यांचा, पंजाबी ढोल तसेच आकर्षक आतषबाजीचादेखील आनंद घेता येणार आहे. सहकुटुंब सामन्याचा आनंद घेण्यासाठी, विशेष बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

जास्तीत जास्त जळगावकर नागरिक व क्रिकेटप्रेमींना या ऐतिहासिक सामना पाहण्यासाठी यावे, असे आवाहन युवाशक्ती फाउंडेशनचे संस्थापक – अध्यक्ष विराज अशोक कावडीया यांनी केले आहे. रविवारच्या सुट्टीची पर्वणी विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवार सुट्टीच्या दिवशी आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना हा अंतिम सामन्याचा क्रिकेटचा थरार अनुभवण्यासाठी पर्वणीच मिळाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now