बाप रे.. पाचोऱ्याच्या डॉक्टरला ५१ हजारात फसविले!

सप्टेंबर 25, 2022 2:24 PM

Pachora News-जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२२ । पाचोरा शहरातील एका ५० वर्षीय डॉक्टरची ५१ हजाराची फसवून केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस स्थानकात तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2022 06 14T142958.323 jpg webp

शहरातील बाहेरपुरा येथील डॉक्टर असलेले राजेंद्र काशिनाथ चौधरी (वय ५०) यांनी शहरालगत असलेल्या एका बखळ प्लॉटची सौदे पावती डॉ.चौधरी यांनी ५१ हजारात केली होती. त्यानंतर सौदे पावतीची मुदत असताना संशयित आरोपी प्रतिभा संजय बोडखे व माधव पायघन यांनी परस्पर राहुल पवार यांनी विक्री करून डॉ.चौधरी यांची फसवणूक केल्याप्रकरणी पाचोरा पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राहुल मोरे हे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now