---Advertisement---
जळगाव जिल्हा जळगाव शहर महाराष्ट्र राजकारण

जळगावच्या सुपुत्राला आमदारकी द्या : मनपा नगरसेवकांची मागणी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२२ । जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र असलेले आणि अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांना राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा यादीमध्ये स्थान देण्यात यावं अशी मागणी जळगाव शहरातील शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली आहे.

sunil chaudhari jalgaon jpg webp webp

सुनील चौधरी हे आता जरी अंबरनाथ येथे राहत असले तरी, त्यांचे मूळ गाव हे जळगाव जिल्ह्यातील आव्हाना हे आहे. या गावी ते नेहमीच येत असतात. यामुळे शहरातील नगरसेवकांची व पदाधिकाऱ्यांची त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. अशा वेळी त्यांना 12 आमदारांच्या यादीत स्थान मिळावं अशी मागणी स्थानिक नगरसेवकांतर्फे करण्यात आली आहे.

---Advertisement---

सुनील चौधरी यांची ख्याती ‘काँक्रीटमॅन’ अशी आहे. जळगाव शहरासाठी ‘मी मुख्यमंत्र्यांच्या मार्फत निधी आणून देऊ इच्छितो’ असे ते कित्येक वेळा म्हणाले आहेत. यामुळे जळगाव शहरातील नगरसेवकांच्या आणि त्यांचा चांगलाच घनिष्ठ संबंध आहे. यामुळेच जळगाव शहरातील शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्यांना 12 आमदारांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावं अशी मागणी केली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---