पत्रकारास धमकी.. सावद्यात ओरीजनल पत्रकार संघातर्फे निषेध!

सप्टेंबर 26, 2022 4:33 PM

Yawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२२ । यावल तालुक्यातील मालोद व परसाडे येथील ग्रामपंचायतीच्या पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी यावल तहसील कार्यालयात सुरू असताना वृत्तांकन करण्यासाठी यावल येथील दिव्य मराठी दैनिकाचे पत्रकार शेखर पटेल गेल्यानंतर तहसीलदार व पोलिस निरीक्षकांनी परवानगी दिल्यानंतरही एका पोलिस कर्मचार्‍याने शेखर पटेल यांना धमकी दिल्याच्या प्रकाराचा सावदा शहरातील आरीजनल पत्रकार संघ, सावदातर्फे निषेध करयण्यात आला आहे.

jalgaon 94

सावदा येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक देविदास इंगोले यांना निवेदनाद्वारे या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. यावेळी ओरीजनल पत्रकार संघ, सावदाचे अध्यक्ष भानुदास भारंबे, उपाध्यक्ष कैलास लवंगडे, सचिव राज चौधरी, सदस्य दीपक श्रावगे, प्रदीप कुळकर्णी, कविता सकळकळे, संतोष परदेशी, रवींद्र महाजन, अनिल इंगळे, देवेंद्र चौधरी आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now