जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२२ । संतूरवादक आणि संगीतकार पंडित शिवकुमार शर्मा यांचं ८४व्या वर्षी निधन झालं. एका महान संतूरवादकाच्या निधनाने संपूर्ण संगीत विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचा जन्म 13 जानेवारी 1938 ला जम्मूला झाला. पाच वर्षांच्या वयापासूनच त्यांनी हे वाद्य त्यांच्या वडिलांकडून शिकायला सुरुवात केली.त्यांनी पहिला कार्यक्रम 1955 मध्ये मुंबईत केला.काश्मीर मध्ये सुफी संगीतासाठी संतूर हे वाद्य वर्षानुवर्षे वापरले जायचे याच वाद्याला जागतिक पातळीवर नेण्याच काम त्यांनी केल.पंडित शिवकुमार शर्मां व हरिप्रसाद चौरसिया यांच्याबरोबकर यांनी त्यांनी अनेक कार्यक्रम केले होतं. त्यातूनच शिव-हरी नावाची जोडी जन्माला आली होती.
पंडित भीमसेन जोशींच्या निधनानंतर भीमसेन महोत्सवात बोलताना पं. शिवकुमार शर्मांनी पं. भीमसेन जोशींबद्दल एक किस्सा सांगितलेला “पं. भीमसेन जोशींचा प्रवासाची प्रचंड आवड होती. ते प्रवास करत भारतभर फिरायचे. खूप वर्षांपूर्वी ते आमच्या घरी आले होते. संतूर या वाद्याबद्दल तेव्हा भारताच्या इतर भागांमध्ये फारशी प्रसिद्धी झालेली नव्हती. पंडितजींनीही ते वाद्य पहिल्यांदाच पाहिलं होतं. माझ्याकडचं संतूर पाहून त्यांनी माझ्याकडे त्याबद्दल चौकशी केली. ते कसं जुळवतात, ते वाजवण्याचं तंत्र काय, ते कुठे बनतं असे अनेक प्रश्न त्यांनी मला विचारले. मी त्यांना उत्तरं दिली आणि संतूर वाजवूनही दाखवलं. त्यानंतर ते वाद्य घेऊन बाजूला गेले आणि काही वेळाने परत आले. त्यांनी एक अख्खा राग संतूरवर वाजवून दाखवला.”