⁠ 
मंगळवार, डिसेंबर 3, 2024
Home | जळगाव जिल्हा | चोपडा | जळगाव जिल्ह्याला काळिमा फासणाऱ्या दंगलींचा असा आहे ‘काळा इतिहास’

जळगाव जिल्ह्याला काळिमा फासणाऱ्या दंगलींचा असा आहे ‘काळा इतिहास’

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप । भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. हे विचार आपण शालेय जीवनापासून आत्मसात करायला सुरुवात करतो. खरं पाहायला गेलो तर संपूर्ण भारतातील 80 टक्के लोक हे विचार आत्मसात करतात आणि या विचारावरच चालतात. मात्र 20% असे असतात ज्यांना हा विचार पटत नाही. किंबहुना ते अतिशय कट्टर पंथी असतात. भारतीयतेच जीवनसत्व या 20% माणसात नसतं. यामुळेच आपल्याला आपल्या जिल्ह्यात, आपल्या परिसरात, आपल्या शहरात कधी काळी दंगली झाल्याचे पाहायला मिळते. एखाद्या शहरात झालेली दंगल हि त्या शहराच्या इतिहासाला लागलेला सर्वात मोठा धब्बा किंबहुना कलंक असतो. आणि हाच कलंक जळगाव जिल्ह्याला सुद्धा लागला आहे. खूप कमी वेळा जरी दंगलीचे प्रसंग जळगाव जिल्ह्यात घडले असले तरी त्याची नोंद संपूर्ण राष्ट्राला घ्यावी लागली इतक्या भीषण त्यावेळेसच्या दंगली होत्या. (riots in jalgaon district)

जळगाव जिल्हा दंगलींच्या बाबतीत देश पातळीवर अतिशय कुप्रसिद्ध आहे. जळगाव शहर ,जामनेर, रावेर, अमळनेर, धरणगाव, चोपडा या ठिकाणी मोठ्या स्वरूपावर दंगली मागील काही वर्षात झाल्याच्या नोंदी आहेत.

1970 च्या काळात जळगावत उसळलेली दंगल ही त्यावेळची भारतातील सर्वात मोठी दंगल मानली गेली होती. ८ मे १९७० रोजी केळकर वादातून एका पान टपरीवर झालेल्या भांडणामुळे जळगाववात दंगल उसळली होती. ही दंगल संपूर्ण शहरात पसरली. या दंगलीमध्ये तब्बल 42 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. अर्थात 42 हा सरकारी आकडा होता. मात्र प्रत्यक्षदर्शी जळगावकरांच्या मते या दंगलीत जवळजवळ दीडशे जणांचा मृत्यू झाला होता.(jaglaon biggest riot)

जोशी पेठ परिसरात सुरू झालेली ही दंगल भीलपुरा, बागवान मोहल्ला, रिधुर वाड्यापर्यंत पोहोचली होती. या दंगली वेळी दंगलखोरांनी लग्नाला आलेल्या एका अख्या वरातीला जाळलं होतं. यात अनेकांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर दंगलीचा वणवा शहरात गतीने पसरला. अनेक ठिकाणी जाळपोळ झाली. रिधुर वाड्यातील नाल्याच्या काठावर यावेळी प्रसिद्ध असलेला मराठा दरबार अगरबत्तीचा कारखाना दंगल खोरांनी जायला. तब्बल तीन दिवस हा कारखाना धगधगत होता. ही परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे लष्कराला प्राचारण करावे लागले होते. साधारणता तीन दिवस शहरामध्ये संचार बंदी होती. जळगाव शहरात दंगल आटोक्यात आली ही या संचारबंदीनंतरच.

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या दंगलग्रस्त भागाची पाहणी केली होती. पुढे केंद्र सरकारने न्यायाधीश डी.पी.मदोन यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव दंगलीसाठी चौकशी आयोग नेमला होता. यावेळी तत्कालीन पोलीस यंत्रणा अपयशी ठरण्याचा आरोप यात करण्यात आला.

जळगाव शहरात एका दैनिकाच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी अक्षय तृतीयेला शिवसेनाप्रमुख हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे जळगाव येथे आले होते. यावेळी त्यांची टॉवर चौकात मोठी सभा झाली होती. सभेच्या दुसऱ्या दिवशी जुगार अड्ड्यावर हिंदू मुस्लिम तरुणांमध्ये जुगाराच्या पैशावरून वाद झाला आणि दंगलीला सुरुवात झाली. बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले भाषण दंगलीचे कारण असल्याचा ठपका माध्यमांनी त्याकाळी ठेवला होता. यामुळे त्यावेळेचे जळगाव जिल्ह्याचे प्रमुख गणेश राणा आणि जयेश कदम या दोघांनी आयोगासमोर बाळासाहेबांच्या भाषणाची कॅसेट ठेवली होती.

२००० साली भुसावळ शहर, अमळनेर या ठिकाणी मोठ्या दंगली उसळल्या. त्यात अनेक जण जखमी झाले. २००१ मध्ये रावेर, जामनेर, पारोळा, भडगाव, चाळीसगाव, पाचोरा या ठिकाणी दंगली उसळल्या.(bhusaval and amalner riot)

१७ जून २००१ रोजी रावेर शहरात उसळलेल्या दंगलीमध्ये एक जण ठार तर अनेक जण जखमी झाले होते. ७ जून २००२ मध्ये जामनेरात उसाळलेल्या दंगलीत सहा जणांना आपला जीव गमावा लागला होता. तर पन्नास हून अधिक जण जखमी झाले होते.(raver and jamner riot)

२००४ मध्ये फैसपूर, धरणगाव मध्ये दंगली झाल्या. २००५ मध्ये जळगाव शहरातील जे.के.पार्क येथे दोन गटात चांगलीच हाणामारी झाली होती.. २००६ मध्ये पाचोरा, भडगाव, अमळनेर, जळगाव, रावेर या ठिकाणी पुन्हा एकदा दंगल पाहायला मिळाली. ()

जळगाव शहराचे म्हणायला गेलो तर मास्टर कॉलनी, तांबापुरा, भीलपुरा, शनिपेठ या संवेदनशील जागा म्हटल्या जातात. शिवाजीनगर सह शहरातील अनेक भागांमध्ये छोट्या मोठ्या दंगली अनेक वेळा झाल्या आहेत. रावेर तालुक्यातील चिनावल येथे 27 फेब्रुवारी 2017 रोजी आठवडे बाजारात भाजीपाल्याचे दुकान लावण्यावरून दंगल उसळली होती.

जळगाव जिल्हातील या दंगलींची नोंद ‘सिमी’ या पुस्तकातून घेण्यात आलेली आहे. हे पुस्तक जळगाव जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार विजय वाघमारे यांनी लिहिले आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह