जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२२ । जळगाव शहराचे वैभव काय? हा प्रश्न कोणत्याही जळगावकराला विचारला तर तो सहजच उत्तर देईल ते म्हणजे मेहरूण तलाव. जळगाव शहरामध्ये कोणीही आलं की, सहजच जळगावकर नागरिक त्याला मेहरूण तलाव दाखवायला घेऊन जातो. कारण मेहरूण तलावाबद्दल सर्वच जळगावकरांना आत्मीयता आहे. प्रेम आहे. (meharun talav jalgaon news)
मात्र गेल्या काही वर्षांपासून या तलावामध्ये मोठ्या प्रमाणावर सांडपाणी सोडलं जात आहे. यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी आता मनपा प्रशासन सज्ज झालं आहे. लवकरच याबाबत तोडगा काढला जाईल असं चित्र दिसत आहे.
जळगाव शहर महानगरपालिकेकडून याबाबत प्राथमिक स्वरूपातली तयारी देखील करण्यात आली आहे. मनपाकडून अहमदाबाद येथील एका एनजीओला तलाव परिसरातील भागातून तलावात येणाऱ्या सांडपाण्याबाबत सर्वेक्षण करून डीपीआर तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती समोर आली आहे. (mah)
यामुळे संबंधित एनजीओच्या कर्मचाऱ्यांनी नगररचना विभागाकडून याबाबत प्राथमिक माहिती घेतली असल्याचे देखील वृत्त समोर आलं आहे. यामुळे लवकरच मनपा प्रशासन जळगाव शहराचे भूषण असलेल्या, जळगाव शहराचा वैभव असलेल्या मेहरूण तलावाला सांडपाणी मुक्त करणार असं दिसत आहे. यामुळे जळगावकर नागरिक मनपा प्रशासनावर प्रचंड खुश होतील यात काही वाद नाही.