⁠ 
शनिवार, ऑक्टोबर 5, 2024
Home | बातम्या | लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे ‘या’ तारखेला मिळेल, सरकारकडून तारीख जाहीर

लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे ‘या’ तारखेला मिळेल, सरकारकडून तारीख जाहीर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२४ । राज्य सरकारने महिलांसाठी सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची मदत केली जात आहे. आतापर्यंत एकूण दोन टप्प्यांत पात्र महिलांना रक्कम मिळाली आहे. दरम्यान, आता तिसऱ्या टप्प्यातील वाटप कधी होणार? याची राज्यभरातील लाडक्या बहिणी वाट पाहात आहेत.

असे असतानाच आता लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना दि. २९ सप्टेंबर पासून डीबीटी द्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

आज मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती.दि.२९ सप्टेंबर २०२४ रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजन संदर्भात आढावा घेण्यात आला.

व्यासपीठाचे व्यवस्थापन, कायदा व सुरक्षा, सांस्कृतिक कार्यक्रम, कार्यक्रमस्थळी पार्किंगची व्यवस्था, पिण्याचे पाणी, लाभार्थ्यांची यशोगाथा याबाबतच्या महत्वाच्या सूचना मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.