बाफनांच्या दुकानात चोरट्यांची हातसफाई, गर्दीत लाखाचे दागिने चोरले

नोव्हेंबर 2, 2022 8:36 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ नोव्हेंबर २०२२ । जळगाव शहरात आणि जिल्ह्यात चोरटे चांगलेच सक्रिय झाले आहेत. रिंगरोडवर असलेल्या हाउस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज या दुकानातून चोरट्यांनी दिवाळीच्या गर्दीचा फायदा घेत १ लाख २ हजार ६५९ रुपयांचे दागिने चोरून नेले आहेत.

theft chori jpg webp

रिंगरोड येथील दीनानाथ वाडीत राहणारे अभिषेक सुनील बाफना यांचे हाउस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज हे दुकान रिंगरोड येथे पीपल्स बँके शेजारी आहे. दिवाळीच्या धामधुमीत दि.२१ च्या रात्री ८.४५ ते दि.२३ च्या सायंकाळी ६.३० च्या दरम्यान गर्दीचा फायदा घेत १ लाख २ हजार ६५९ रुपयांचे दागिने चोरून नेले.

चोरट्यांनी दुकानातून सोने आणि डायमंडचे २ मंगळसूत्र आणि २ अंगठ्या असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. याप्रकरणी अभिषेक बाफना यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि किशोर पवार करीत आहेत.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now