धरणगावात चोरट्यांनी बंद घर फोडले ; सोन्याच्या अंगठीसह रोकड लंपास

ऑगस्ट 12, 2025 6:38 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात घरफोडीच्या काही कमी होताना दिसत नसून अशातच धरणगाव शहरातील कृष्ण गीता नगरात बंद घर असल्याचा फायदा घेत चोरटयांनी डल्ला मारला. शंकर जनार्दन पाटील यांच्याघरात ही चोरी झाली असून आज, १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४:३० वाजता ते आपल्या घरी कृष्णा गीता नगरात परतले. घरात प्रवेश करताच त्यांना घर फोडल्याचे लक्षात आले.

drn chori

त्यांनी तात्काळ कॉलनीतील शेजाऱ्यांना बोलावले. सर्व कॉलनीवासी एकत्र जमल्यानंतर घरात प्रवेश केला असता, घरातील कपाट, किचनमधील डबे आणि बेडरूममधील बेड व कपाट हे सर्व अस्ताव्यस्त पडलेले दिसले. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

शंकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातील कपाटात ठेवलेले तीस हजार रुपये रोख आणि सोन्याची अंगठी चोरट्यांनी लंपास केली होती. या घटनेनंतर त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठून घडलेली हकीकत पोलिसांना सांगितली.

या चोरीमुळे कृष्ण गीता नगरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही कृष्ण गीता नगरमध्ये चोरट्यांनी अनेकदा चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून चोरट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now