Sunday, December 4, 2022

विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर चोरट्यांनी साधला डाव, उच्च माध्यमिक विद्यालय फोडले

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२२ । हल्लीच्या काळात चोरटा कुठे डल्ला मारेल याचा नेम नाही. संधी हेरत चोरटा लागलीच डल्ला मारण्याचा प्रत्नात असतो की, काय ? चक्क उच्च माध्यमिक विद्यालयात डल्ला मारत हजारोंचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरु आहे.

- Advertisement -

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा नुकत्याच सुरु करण्यात आल्या आहे. मात्र, एकीकडे चोरट्यांचा शाळांवर डल्ला मारण्याचे काम सुरु असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. आधीच कोरोनामुळे शाळा बंद असल्याने शाळेकरी विद्यार्थ्यांचे आयुष्य कठीण वळणावर पोहचले होते. अखेर त्यांच्या शिक्षणाला वेल फुटली आहे. पंरतु, शाळेतील काही साहित्य चोरट्यांनी असेच चोरून नेले तर एक दिवस चोरटे शाळाच पाळून सगळं साहित्य चोरून नेतील? असा नकीच निर्माण होतो, त्यामुळे अश्या चोरट्यांवर वेळीच आळा घाल्याची गरज आहे.

यावल तालुक्यातील चिंचोली येथील उच्च माध्यमिक विद्यालयात ही घटना उघडीस आली आहे. याबाबत रवींद्र रावते (वय ५५, रा. किनगाव ता. यावल ) यांनी फिर्यादी दिली. दि. १५ ते १६ रोजी सकाळी ७.०० वाजेच्या दरम्यान, चोरट्यांनी विद्यालयाचा दरवाजा तोडून आता प्रवेश करून तब्बल ३६ हजार ६३० रुपयांचा ऐवज चोरून नेला.

- Advertisement -

रवींद्र रावते यांनी दि. १६ रोजी यावल पोलिसांत तक्रार दिली. घटनास्थळी पोलीस अधीक्षक आतिश कांबळे यांनी भेट देत पाहणी केली. त्यानुसार अनोळखी भामट्या विरुद्दच भा, कलम ४५७,३७० प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास अजीज शेख करीत आहे.

- Advertisement -
[adinserter block="2"]