ते’ निलेश पाटील विसरले : शिवसेनेचे प्रत्युत्तर

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ फेब्रुवारी २०२३ । जयश्री महाजन या एकनाथ शिंदे यांच्या जोरावरच महापालिकत महापौर झाल्या. महापालिकेत शिवसेनेचा भगवा फडकला तो केवळ एकनाथ शिंदे व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यामुळेच, त्यामुळे महापौरांनी यांचे उपकार जाणून, त्यांच्यासोबत न येता, ठाकरे गटात राहिल्या असा आरोप शिवसेना शिंदे गट जिल्हाध्यक्ष निलेश पाटील यांनी केला होता. यावर शिवसेना (ठाकरे गट) महानगरप्रमुख शरद तायडे यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

जयश्री महाजन या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच पाठबळाने महापौर झाल्या हे मान्य आहे. त्यावेळी श्री. शिंदेसाहेबांनी मदत केली. त्याबद्दल त्यांचे आभारीच आहोत. मात्र पक्षप्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या सूचनेवरुन त्यांनी महापौर होण्यासाठी मदत केली हे निलेश पाटील सोईस्कररित्या विसरले आहेत असे शिवसेना (ठाकरे गट) महानगरप्रमुख शरद तायडे म्हणाले.

याचबरोबर शिवसेनेचा महापौर होऊ शकतो हे लक्षात आल्याने श्री. उद्धवसाहेबांनी सांगीतल्यानंतरच शिंदे साहेबांनी सहकार्य केले होते.असेही शिवसेना (ठाकरे गट) महानगरप्रमुख शरद तायडे म्हणाले.