⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

या 10 शेअर्सनी 5 वर्षात 10 लाखाचे केले 1.7 कोटी, तुमच्याकडे आहेत का शेअर?

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ डिसेंबर २०२१ ।  गेल्या काही वर्षात शेअर्स बाजारात मोठा बदल दिसून आला आहे. आजकाल बरेच लोक शेअर मार्केटमधून चांगला पैसा कमवीत आहे. तर काहींच्या पदरी निराशा आली आहे. परंतु आज आम्ही तुमही अशा 10 शेअर्सची माहिती देणार आहोत ज्यांनी गेल्या 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना लखपती ते करोडपती बनवले आहे. ज्या गुंतवणूक दारांनी 5 वर्षांपूर्वी या शेअर्समध्ये 10 लाख रुपये गुंतवले होते त्यांचे आता 1.7 कोटी रुपये झाले आहेत. 2016 ते 2021 दरम्यान सर्वात जलद गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत गौतम अदानी यांची अदानी ट्रान्समिशन पहिल्या क्रमांकावर आहे.

‘हे’ आहेत 10 शेअर्स?

अदानी ट्रान्समिशन (Adani Transmission), दीपक नाइट्रेट (Deepak Nitrite), अदानी एंटरप्राइजेज (Adani Enterprises), टनाला प्लॅटफॉर्म (Tanla Platforms), रुची सोया (Ruchi Soya), अलकाइल अमाइन्स (Alkyl Amines), वैभव ग्लोबल (Vaibhav Global), APL अपोलो ट्युब्ज (APL Apollo Tubes), P&G हेल्थ (P&G Health) आणि एस्कॉर्ट्स (Escorts)

गुजरातच्या या इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिशन कंपनीने 2016 ते 2021 दरम्यान 93% चक्रवाढ वार्षिक वाढ दराने (CAGR) संपत्ती निर्माण केली आहे. या प्रकरणात, दुसरा क्रमांक दीपक नायट्रेटचा आहे, ज्याने गुंतवणूकदारांसाठी 90 टक्के वार्षिक चक्रवाढ दर मिळवला आहे. अदानी एंटरप्रायझेसने वार्षिक 86 टक्के, तन्ला प्लॅटफॉर्मने 85 टक्के आणि रुची सोयाने 81 टक्के कमाई केली आहे.

रिलायन्स सर्वात मोठी संपत्ती निर्माता
याशिवाय अल्काइल अमाइन्स, वैभव ग्लोबल, एपीएल अपोलो ट्यूब्स, पी अँड जी हेल्थ आणि एस्कॉर्ट्स यांचा या यादीत समावेश आहे. गेल्या 5 वर्षांत गुंतवणूकदार आणि उद्योजकांनी 71 लाख कोटी रुपयांची संपत्ती निर्माण केली आहे, जो आजपर्यंतचा विक्रम आहे.

मोतीलाल ओसवाल यांच्या 26 व्या वार्षिक संपत्ती निर्मिती अभ्यासानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज सर्वात मोठी संपत्ती निर्माण करणारी कंपनी म्हणून उदयास आली आहे. देशातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज ही सलग तिसऱ्यांदा सर्वात मोठी संपत्ती निर्माण करणारी कंपनी ठरली. 2016 ते 2021 या कालावधीत या कंपनीने 9.7 लाख कोटी रुपयांची संपत्ती उभारली. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम आहे.

अदानी एंटरप्रायझेसची सर्वांगीण कामगिरी
याप्रकरणी कंपनीने स्वतःचाच विक्रम मोडला आहे. यापूर्वी, कंपनीने 2014 ते 2019 दरम्यान 5.6 लाख कोटी रुपयांची कमाई केली होती. या कालावधीत, कंपनीच्या नफ्यात वार्षिक 8 टक्क्यांनी वाढ झाली तर शेअरची किंमत चक्रवाढ वार्षिक 31 टक्क्यांनी वाढली. या काळात सर्वाधिक संपत्ती निर्माण करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत TCS, HDFC बँक आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचा समावेश करण्यात आला.

दरम्यान, अदानी एंटरप्रायझेस सर्वात सातत्यपूर्ण आणि सर्वाधिक सर्वांगीण संपत्ती निर्माण करणारा म्हणून उदयास आला आहे. मोतीलाल ओसवाल यांच्या अभ्यासानुसार, 2016 ते 2021 दरम्यान, या कंपनीच्या स्टॉकने गेली सलग 5 वर्षे चांगली कामगिरी केली आहे आणि 86 टक्के CAGR वर परतावा दिला आहे. तसेच या स्टॉकने सर्व श्रेणींमध्ये अष्टपैलू कामगिरी केली आहे.

(म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. कृपया गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या सल्लागाराचा सल्ला घ्या.)