ठाकरे गटात उभी फूट : ठाकरेसैनिक झाले शिंदेवासी

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ फेब्रुवारी २०२३ । शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात उभी फूट पडली आहे. उपतालुका प्रमुख सुनील पाटील यांच्या सह शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत (Eknath Shinde) जाहीर प्रवेश केला आहे. पर्यायी शहरात ठाकरे गटाला मोठा धक्का लागला आहे.

अधिक माहिती अशी कि, उद्धव ठाकरे गटाच्या नवीन तालुका कार्यकारिणीत उपतालुका प्रमुखपदी नियुक्ती झालेले सुनील पाटील यांनी अचानक पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थिती मालेगाव येथे शिवसैनिकांसह शिंदे गटात प्रवेश केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

तीस वर्षांपासून सुनील पाटील हे शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला सटाणा शहरात धक्का बसला आहे. सुनील पाटील यांच्यासह समवेत सटाणा शहरासह ग्रामीण भागातील बबन सोनवणे, सुरज परदेशी, करण अहिरे, तुषार सोनवणे, दिनेश सोनवणे, वैभव सोनवणे, गौरव सोनवणे, धीरज सोनवणे यांसह विविध कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते