शेत शिवारात केळीसह केबलवायरांची चोरी

एप्रिल 16, 2022 5:34 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२२ । रावेर तालुक्यातील अजनाड येथील शेती शिवारातील केळी बागेतील केळीचे घड व वीज पंपाच्या केबल वायर चोरी झाल्याची घटना घडली आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.

केडी चोरी

अजनाडचे शेतकरी राहुल महाजन यांच्या शिवारातील गट नंबर ३३७ मध्ये १४ एप्रिलच्या रात्री कोणी तरी अज्ञात चोरट्याने ८ ते १० महिन्याच्या केळीचे कापणी लायक असलेले १५ घड अंदाजे तीन हजार रुपये किमतीचे चोरून नेल्याची घटना घडली. शुक्रवारी ही घटना उघडकीस आली. तर त्याच शेता शेजारी शिवारातील जगन्नाथ चौधरी, सुरेश महाजन, जगदीश पाटील, गजानन पाटील, विनोद महाजन, गणेश चौधरी या शेतकऱ्यांच्या शेतीमधील वीज पंपाची केबल चोरून नेल्याचेही त्यांनी सांगितले. राहुल महाजन, रा.अजनाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल नितीन डाबरे करत आहे. .

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now