गुन्हेजळगाव शहर

खळबळजनक : भरदिवसा रिक्षात बसवून प्रवाशाला लुटले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जून २०२१ । शहरातील अजिंठा चौफुली तेथून रिक्षाने चित्रा चौकाकडे जाण्यासाठी निघालेल्या एका व्यक्तीला रिक्षाचालकासह तिघांनी धक्काबुक्की करीत त्याच्याकडील पंचवीस हजार रुपये लुटल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. दरम्यान एमआयडीसी पोलिसांनी लागलीच तपास चक्रे फिरवीत रिक्षासह दोघांना ताब्यात घेतले आहे.

जामनेर येथील अब्दुल कलीम गफुर शेख वय-५९ हे बुधवारी जामनेर येथून खरेदीसाठी एसटी बसने जळगाव येथे आले होते. दुपारी एक वाजेच्या सुमारास अजिंठा चौफुली येथून रिक्षाने ते चित्रा चौक येथे जाण्यासाठी रिक्षात बसले.

रिक्षामध्ये अगोदरच तीन जण बसलेले होते. रिक्षा स्मशानभूमी जवळ पोहोचली असताना तिघे अब्दुल शेख यांच्यासोबत धक्काबुक्की करू लागले. यावेळी एकाने जबरदस्ती त्यांच्या खिशातील पंचवीस हजार रुपये काढून घेतले व त्यांना रिक्षातून लोटन खाली फेकून दिले. रिक्षातून पडल्यानंतर शेख यांनी जावई इस्माईल शेख यांना फोन करून कळवले. काही वेळाने घटनेबाबत एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर मिळालेल्या वर्णनानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळालेल्या माहितीनुसार गेंदालाल मिल परिसरातून मोहसीन नूर खान व शाहरुख रफीक शेख यांना सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, हेमंत कळस्कर, मुकेश पाटील, सुधीर साळवे, चंद्रकांत पाटील, सचिन पाटील, साईनाथ मुंढे अशानी ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. शहर पोलीस ठाण्याचे होमगार्ड भूषण मोरे यांनी याप्रकरणी पोलिसांना सहकार्य केले. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली असून त्यांच्यासोबत असलेल्या इतर दोन साथीदार अशरफ पिंजारी व हर्षद मुलतानी यांचे नावे निष्पन्न करण्यात आलेले असून त्यांचा शोध सुरू आहे. आरोपी यांनी अशाप्रकारचे बरेच गुन्हे केले असून दोन्ही आरोपींवर यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

आरोपी मजकूर यांच्याकडून गुन्ह्यातील दहा हजार रुपये जप्त करण्यात आलेले असून त्यांना उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Related Articles

Back to top button