⁠ 
गुरूवार, मे 9, 2024

म्हशीला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी शेतकरी नदीत उतरला, पण घडलं विपरीत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२३ । मागील दोन दिवसात जिल्ह्यातील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नदी नाल्यांना पूर आला. मात्र यातच नदीच्या पात्रात अडकलेल्या म्हशीला बाहेर काढण्यासाठी पाण्यात उतरलेल्या शेतकऱ्याचा पाय घसरून पुरात बुडून मृत्यू झाल्याची घटना पारोळा तालुक्यात घडलीय. कमलाकर हिम्मत पाटील (वय 50, रा. भिलाली ता. पारोळा) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे.

नेमकी काय आहे घटना?

दोन दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे बोरी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला. दरम्यान, तामसवाडी येथील बोरी नदीवरच्या धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झालेला आहे.याबाबतची माहिती आधी देण्यात न आल्यामुळे खालील बाजूला असलेल्या शेतकर्‍यांसह ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात धांदल उडाली.

दरम्यान, बोरी नदीला अचानकपणे आलेल्या पुरात कमलाकर पाटील या शेतकर्‍याची म्हैस सापडली. आपल्या म्हशीला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी ते नदीच्या पात्रात उतरले. मात्र पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात आल्यामुळे ते यात बुडाले. याबाबतची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. तथापि, यात यश आले नाही.

अखेर यासाठी राज्य आपत्ती दलाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाला कमलाकर हिंमत पाटील यांचा मृतदेह आढळून आला. नदीपात्रात सुमारे दोनशे फुट अंतरावर त्यांचा मृतदेह पहाटे आढळून आला असून एसडीआरएफच्या पथकाने त्यांचे पार्थिव बाहेर काढले.