तापी नदीत बुडून दापोरीच्या बालकाचा मृत्यू

नोव्हेंबर 4, 2021 12:23 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२१ । अमळनेर तालुक्यातील मुंगसे येथून जवळच असलेल्या दापोरी खुर्द येथे तापी नदी पात्रात बालकाचा पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. रोशन युवराज सोनवणे (वय ९) हा निंभोरा (ता. धरणगाव) येथील मुळ रहिवासी आहे.

new 1 jpg webp

तो दापाेरी येथील नामदेव सुका कोळी यांच्याकडे राहत होता. मुंगसे जि.प.शाळेत इयत्ता दुसरीमध्ये शिकत होता. दुपारी गुरांना पाणी पाजण्यासाठी नदीवर गेला असता पाण्यात पाय घसरल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला. चोपडा येथे नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. निंभोरा येथे रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात दफनविधी झाला. त्याच्या पश्चात तीन बहिणी, आई वडील, आजी-आजोबा असा परिवार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now