जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२२ । जळगावातील तरुणाला नोकरीचे आमिष देवून तब्बल दोन लाखात फसवल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील गायत्रीनगर येथील रहिवासी असलेले प्रमोद दिनकर इंगळे यांना ‘मॉलकेअर मी ट्रेड स्टोअर’ या वेबसाईटवरील लिंकमध्ये जॉब बाबतची माहिती दिसून आली. यात इंगळे यांना पार्ट टाईम जॉबच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळेल असे सांगण्यात आले. या कामासाठी त्यांना पैसे भरण्याचे सांगण्यात आले.
याबाबत त्यांच्या मोबाईलवर तीन जणांनी संपर्क साधला. दरम्यान या तिघांनी सांगितल्यानुसार प्रमोद इंगळे यांनी त्यांच्या अकाऊंटवर २ लाख ३ हजार ५०० रूपये भरले. यानंतर मात्र त्यांनी संपर्क टाळला. याप्रकरणी इंगळे यांना फसवूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी एमआयडीसी पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून यानुसार तीन अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पीएसआय रवींद्र गिरासे करत आहेत.