⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

चाैकशीसाठी खासगी रुग्णालयाचे डीव्हीआर पाेलिसांच्या ताब्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२१ । शहरातील एका शासकीय विश्रामगृहात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याचे आणि त्यात राजकीय पक्षाचा पुढारी सामील असल्याच्या ‘चर्चे’ची बातमी काही समाजमाध्यमातून फिरते आहे. मंगळवारी एका खासगी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजचे डीव्हीआर मशीन रामानंदनगर पोलिसांनी ताब्यात घेतले.

या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या पत्रानंतर पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. मंगळवारी एका खासगी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजचे डीव्हीआर मशीन रामानंदनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. या रुग्णालयात पीडित मुलगी दोन तास दाखल असल्याची चर्चा होती. ७ नोव्हेंबर रोजी दुपारपासून या चर्चा सुरू झाल्या आहेत.

या चर्चेचा उगम कुठून झाला, हे समोर आले नसले तरी काही समाजमाध्यमांतून या चर्चेची बातमी करण्यात आल्यामुळे ही चर्चा जिल्हाभर आणि बाहेरच्या जिल्ह्यातील पत्रकारांच्या समूहांमध्येही पसरली. त्या अनुशंगाने सोमवारी राजकीय पक्षांत चढाओढ सुरू झाली. भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसने पोलिस अधीक्षक मुंढे यांना निवेदन दिले.