⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यावर स्टीलच्या रॉडने वार

जळगाव लाईव्ह न्यूज| १० ऑगस्ट २०२३। पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून तिच्या डोक्यामध्ये मोटरसायकलच्या स्टीलच्या शॉकअपच्या दांड्याने तिच्या डोक्यावर वार करून तिला गंभीर दुखापत केल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील विसापूर तांडा येथे घडली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पोपट शांताराम सोनवणे हल्ली मुक्काम विसापूर तांडा ता. चाळीसगाव हा पत्नी थापाबाई पोपट सोनवणे हिच्यासोबत येथे राहायला आहे. मात्र पोपट हा पत्नीच्या चरित्रावर वारंवार संशय घेत असल्याने दोघांमध्ये भांडणे होत होते. नऊ ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास पत्नी झोपेत असताना पोपट याने पत्नी थापा बाईच्या डोक्यात मोटरसायकलच्या स्टीलच्या दांड्याने वार करून तिला गंभीर जखमी केल्याची घटना घडली.

याप्रकरणी निंबा वाघ यांनी फिर्याद दिल्यावरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आरोपी पतीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव करीत आहे.