⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

ग्राहक कुंटनखान्यात जाताच ‘तो’ चोरायचा दुचाकी, शहर पोलिसांनी ५ दिवसात हस्तगत केल्या २६ दुचाकी!

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२२ । जळगाव शहरातील जिल्ह्यातील वाढत्या दुचाकी चोरी रोखण्यासाठी पोलीस परिश्रम घेत आहेत. तीन दिवसापूर्वीच जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने एका दुचाकी चोरट्याला पकडत त्याच्याकडून चोरीच्या अकरा दुचाकी हस्तगत केल्या होत्या. दरम्यान, दोन दिवसानंतर पुन्हा एकाला पकडण्यात आले असून त्याच्याकडून १५ चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

जळगांव शहर पो.स्टे. हद्दीत जळगांव जिल्हयातील मोठी बाजारपेठ असल्याने जिल्हयातील नागरीकांची खरेदीसाठी खुप गर्दी होत असते. गर्दीचा फायदा घेवुन चोरटयांनी नागरीकांच्या मो.सा.चोरण्याचा धडाकाच लावला होता. विशेषता शहरातील मुख्य मार्केट भागात चोरीचे प्रमाण खुप वाढले होते. त्यावरून जळगांव शहर पो.स्टेला मो.सा. चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत.

जळगाव शहरात बरेच मो.सा. चोरीचे प्रकार हे घडत असल्याने पोलीस अधिक्षक डॉ.प्रविण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधिक्षक कुमार चिंथा यांनी मो.सा. चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत विशेष लक्ष देवून सुचना केल्या होत्या. त्यावरुन जळगांव शहर पो.स्टेचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांनी आपल्या पो.स्टेचे डी. बी. पथकास वारंवार मो.सा. चोरीच्या ठिकाणावर पथकाकडून सापळा लावून गेल्या दोन-तीन महिन्यापासून पथक आरोपीच्या मागावर होते. तसेच पथकाला दररोज वेगवेळ्या सुचना करणे त्यांचेकडून आढावा घेवून मागील काही दिवसांमध्ये मो.सा. चोरीचे प्रमाण कमी करण्यात यश आले होते परंतु मो.सा. चोर मात्र मिळत नव्हते आणि पुन्हा मो.सा. चोरीचे प्रमाण वाढले होते.

पोलीस निरीक्षक यांनी पथकाला संयम न सोडता कायम चोरट्याचे मागावर रहा अशा सुचना दिल्या आणि गेल्या काही महिन्यापासुन मागावर असलेल्या पथकाला अखेर यश आले. दि.१५ रोजी सायंकाळी आरोपी दुचाकी चोरीसाठी आला असल्याची माहिती पोलीस नाईक किशोर निकुंभ, गजानन बडगुजर, तेजस मराठे, योगेश घाटे यांना मिळाली होती. त्यामुळे पुर्वीच सापळा लावून बसलेल्या पथक अधिकच सर्तक झाले आणि सायंकाळी ६ वाजता दाणाबाजार परिसरात येताच पोवीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, पोहेकॉ उमेश भांडारकर पोना किशोर निकुंभ, गजानन बडगुजर, योगेश पाटील, राजकुमार चव्हाण, कर्मचारी रतन गिते, तेजस मराठे, योगेश इंथाटे, यांनी आरोपीला ताब्यात घेतले.

रोहीत तुळशीराम कोळी वय-१९ रा.चौगांव ता.चोपडा जि.जळगांव असे चोरट्याचे नाव असून त्याने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली असून आतापावेतो १५ मो.सा. जप्त करण्यात आल्या आहेत. त्याचा एक साथीदार फरार असुन त्याने ही बऱ्याच दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. दि.१२ रोजी आरोपी पवन प्रेमचंद पाटील वय-२६ रा. आव्हाणी ता.धरणगांव जि. जळगांव या आरोपीने ११ मो.सा. काढुन दिल्या असून मागील पाच दिवसामध्ये जळगांव शहर पोलीस पथकाने एकूण २६ मो.सा. जप्त केल्या आहेत.

पहा व्हिडीओ प्रक्षेपण :