आधी हाताला चाकू मारला, नंतर पंख्याला गळफास जळगावातील तरुणीने संपविले जीवन

जुलै 11, 2024 6:18 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२४ । जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीने हाताला चाकू मारून नंतर पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज ११ जुलै रोजी सकाळी घडली. दुहिता संजयकुमार मोरे (वय २५, रा. विद्युत कॉलनी, जळगाव) असे मयत तरुणीचे नाव असून याबाबत रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

duhita more jpg webp

याबाबत असे की, शहरातील विद्युत कॉलनी परिसरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या परिसरात दुहिता मोरे ही आई, वडील, भाऊ यांच्यासह राहत होती. नुकतेच बारावीचे शिक्षण झाल्यानंतर ती घरीच होती. दरम्यान नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, तिचे आते भावाशी लग्न ठरले होते. त्याचा दोन महिन्यांपूर्वी अपघातात मृत्यू झाला. या मृत्यूमुळे दुहिता मोरे ही खूप दुःखी झाली होती. त्यामुळे ती सारखी तणावात राहायची. याच तणावातून तिने राहत्या घरी डाव्या हाताला चाकू मारून घेत गळफास घेऊन आत्महत्या केली.

कुटुंबीयांना घटना समजताच त्यांनी तातडीने तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. रक्षा रोकडे यांनी तपासणीअंती तिला मयत घोषित केले. (केसीएन)यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. प्रसंगी रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. मुलीच्या अचानक जाण्यामुळे कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now