---Advertisement---
जळगाव जिल्हा गुन्हे चाळीसगाव

Chalisagaon : चुलत दिरासह प्रेम संबंध! पत्नीने अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने केला खून

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२४ । प्रेम संबंधात अडथळा निर्माण होईल म्हणून पत्नीने दिराच्या मदतीने पतीचा ब्लेडच्या सहाय्याने पोटावर वार करून तसेच दगड डोक्यात टाकून खून केला. तसेच अपघात वाटावा म्हणून त्याचा मृतदेह कोदगाव शिवारात महामार्गावर टाकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. बाळू सिताराम पवार (रा. गवळीवाडा, न्यायडोंगरी ता. नांदगाव) असे खून आलेल्या व्यक्तीने नाव असून ही थरारक घटना चाळीसगाव तालुक्यातील कोदगाव येथे बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणी महिला व तिच्या चुलत दिराला अटक करण्यात आली आहे.

crime jpg webp

नेमकी घटना काय?
बाळू सीताराम पवार हा पत्नी वंदना पवार (३०) हिच्यासह नाशिक जिल्ह्यातील न्यायडोंगरी येथे राहत होता. तिचे व चुलत दीर गजानन राजेंद्र पवार (३२, रा. न्यायडोंगरी, ता. नांदगाव, जि. नाशिक) याच्याशी मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते.वंदना व बाळू हे मंगळवार १८ रोजी न्यायडोंगरी येथून चाळीसगाव येथे आले. बाळू यास गजानन याने दारू पाजली. सायंकाळी गजानन यास दुचाकीने कोदगाव ता. चाळीसगाव शिवारात नेले. तिथे वंदनाने बाळूच्या पोटावर ब्लेडने वार केले आणि दोन वेळा डोक्यात मोठा दगड टाकून त्यास ठार मारले आणि मृतदेह महामार्गावर टाकून दिला. बाळूच्या खिशात आधारकार्ड ठेवले. यानंतर दोघे तेथून पसार झाले.

---Advertisement---


राष्ट्रीय महामार्ग ५२ वर कोदगाव शिवारात १८ रोजी रात्री ११ वाजेच्या पूर्वी बाळू सिताराम पवार याचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. घटनास्थळी रक्ताने माखलेला दगड मिळून आला. बाळू पवार याच्या शरीरावर ब्लेड व दगडाने मारल्याचा खुणा आढळून आल्या. दगड व ब्लेडने गंभीर दुखापत करून त्याचा खून केल्याचे प्रथमदर्शी दिसून आले. शहर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवताच मृत्युमुखी पडलेल्या इसमाच्या पत्नीला खुनाच्या गुन्ह्यात अटक केली. व्यसनाधीन पतीच्या त्रासाला कंटाळून व चुलत दिराशी असलेल्या प्रेम संबंधातून खून केल्याची कबुली संशयित आरोपी वंदना पवार हिने दिली आहे.

मोबाइल लोकेशनवरून महिलेला पकडले
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहाची झाडाझडती घेतली असता पोलिसांना मृत इसमाच्या पत्नीचा मोबाइल नंबर मिळाला. त्या आधारे पोलिसांनी मृताच्या पत्नीला फोन करून तूकुठे आहे असे विचारले, त्यानंतर त्या महिलेने पोलिसांना सांगितले की, मी सध्या शिर्डीला आहे आणि माझा पती नायडोंगरीला गेला आहे. परंतु पोलिसांना महिलेच्या बोलण्यावर संशय आला. पोलिसांनी महिलेचा फोन ट्रेस केला असता महिलेचे लोकेशन चाळीसगाव रेल्वे पोलिस स्टेशन दाखवत असल्याचे आढळून आले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---