जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२३ । सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निकाल हा आमच्यासाठी अपेक्षित निकाल होता. आम्ही पूर्ण तयारीनिशी आमची बाजू मांडली आणि न्यायालयाने ती ऐकून घेत आपला निकाल दिला अशी प्रतिक्रिया आमदार चिमण आबा पाटील यांनी ‘जळगाव लाईव्ह’ बोलताना दिली.
यावेळी ते म्हणाले की, आम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय हा विचार करूनच घेतला होता. प्रत्येक वेळी आम्ही आमची बाजू भक्कमपणे मांडली. यामुळे आमचा विजय होईल अशी आम्हाला अपेक्षा होती आणि झाले ही तसेच
याचबरोबर कोर्टाने ओढलेल्या ताशेऱ्यांबाबत आमदार चिमणआबा पाटील यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले कि, याबाबत जोपर्यंत कोर्टाचे अधिकृत निकाल हाती येत नाही तोपर्यंत कोणीही काहीही बोलणे हे चुकीचे आहे. कारण कित्येकदा कोर्टाचा म्हणणं एक असतं आणि आपल्याला दुसरं वाटतं. यामुळे निकालाची प्रत हाती येऊ द्या नंतर आपण यावर बोलू