बँक फोडून तब्बल अडीच कोटी लांबविणारा चोरटा गजाआड

जुलै 11, 2022 10:20 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२२ । बँक फोडून तब्बल अडीच कोटी रुपयांची रक्कम लांबविणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. चोरट्याने साथीदारांच्या मदतीने बँकेत दरोडा टाकून सुमारे अडीच रुपये चोरून नेले होते. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल होता. अखेर पोलिसांनी गुन्ह्यातील चोरट्याला अटक केली आहे.

crime telangana

शेख समीर शेख नासीर (जामनेर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. जामनेर येथील रहिवासी असलेला शेख समीर शेख नसीर हासराईत गुन्हेगार असून त्याच्यावर आधीच अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याने सुरत येथील काही साथीदारांनी घेऊन त्याने तेलंगणा राज्यातील कुंकनुर या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येणार्‍या बँकेत दरोडा टाकून सुमारे अडीच कोटी रुपये चोरी केले होते. त्याबाबत पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून कंकनूर येथील पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता. शेख समीर शेख नासीर हा जामनेर येथील मूळ रहिवासी असल्याचे कळाल्यानंतर त्यास ताब्यात घेण्यासाठी तेलंगणा पोलिस जामनेर येथे आले होते.

या घटनेत जामनेर पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवून संबंधित चोरटा शेख समीर शेख नासीर याला पकडून अटक केली. आरोपीला तातडीने तेलंगणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कामगिरी जामनरेच पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जयेंद्र पगारे, योगेश महाजन, तुषार पाटील, निलेश घुगे यांनी तेलंगणा पोलिसांच्या मदतीने केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now