⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

पोलिसांना झटका देत पसार झालेला संशयित पुन्हा जेरबंद

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२२ । न्यायालयातून कारागृहात नेत असताना पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीने हाताला झटका देऊन पळ काढल्याची घटना काल सायंकाळी अमळनेर येथे घडली होती. त्या संशयित आरोपीला पोलिसांनी पुन्हा जेरबंद करण्याकेले असून सदर आरोपी हा गंभीर गुन्ह्यातील होता.

राजेश एकनाथ निकुभ उर्फ दादू धोबी रा अमळनेर असे आरोपीचे नाव आहे. काल दि.२४ रोजी न्यायालयातून कारागृहात नेत असताना पोलिसांच्या हाताला झटका मारून पळ काढला होता. याबाबत अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल होता, सदर आरोपीचा शोध घेणेसाठी पोलीस निरिक्षक जयपाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली आयएसपी बापू साळुंखे, एचसी सुनील हटकर, पीएन दिपक माळी, पीएन रवींद्र पाटील, पीसी निलेश मोरे, पीसी गणेश पाटील, चालक पीसी सुनील पाटील यांचे पथक नेमण्यात आले होते.

आरोपीचा शोध घेत असतांना आरोपी फागणे धुळे याठिकाणी असुन पुढे सुरतला पळून जात असल्याची माहीती त्याचा साथीदार व सराईत गुन्हेगार तुषार प्रदीप कदम रा नवल नगर याला ताब्यात घेवून मिळवली व नंतर तालुका पो स्टे धुळे याची मदत घेऊन सराईत गुन्हेगार राजेश उर्फ दादू एकनाथ निकुंभ यास बाळापूर गावा जवळून शिताफीने पकडून अमळनेर पोलीस स्टेशन ला आणले व आरोपी पळून गेलानंतर पुढील आठ तासात त्याला पुन्हा जेरबंद करत उत्कृष्ट कामगीरी केली आहे.