जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जानेवारी २०२२ । शहरात सर्वत्र अमृत योजनेंतर्गत भूमिगत गटारी व पाइपलाइनचे काम सुरू आहे. रस्ते खोदून तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी केली आहे. सिंधी कॉलनीतून एका तरुणाच्या हातातून मोबाइल हिसकावून पळून जाणाऱ्या भामट्यांची दुचाकी खडबडीत रस्त्यावरून घसरली. त्यात एक जमावाच्या हाती लागला तर दुसरा पळून गेला. सापडलेल्या भामट्याला नागरिकांनी चाेप दिला.

अमित नरसिंग पावरा (वय २७, रा. मूजे महाविद्यालय परिसर) हा तरुण रविवारी सायंकाळी ७.३० वाजता सिंधी कॉलनी परिसरातून पायी जात होता. यावेळी एका दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी त्याच्या हातातील १० हजार रुपये किमतीचा मोबाइल हिसकावून कंजरवाडा परिसराकडे पळ काढला.दरम्यान, सिंधी कॉलनी ते पांडे चौक या रस्त्यावर अमृतचे काम सुरू असल्याने रस्ता खड्डेमय झाला आहे. त्या रस्त्यावरून पळून जात असताना या भामट्यांची दुचाकी घसरली. त्यामुळे दोघे दुचाकीसह रस्त्यावर कोसळले. पाठलाग करणाऱ्या लोकांच्या हाती ते सापडले. एक भामटा अंधाराचा फायदा घेत पसार झाला. तर दुसऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलास नागरिकांनी पकडले.

हे देखील वाचा :
- चाळीसगावात गुटखा तस्करीचा पर्दाफाश; दोघे ताब्यात, 16.91 लाखांचा मुद्देमाल जप्त
- पाचोऱ्यातील फूल विक्रेत्याला लावला तब्बल २३ लाखांचा गंडा ; अशी झाली फसवणूक?
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!
- जळगावात जिओ टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरी करणारा जेरबंद






