शनिवार, डिसेंबर 2, 2023

जळगावकरांचा त्रास होईना कमी : तीन महिण्यापुर्वीच डांबरीकरण करून बनविलेला रस्ता पुन्हा खोदला

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२३ । जळगाव शहरातील खराब रस्त्यांबाबत नेहमीच आरडा ओरड होत असते. त्यातही काही ठिकाणी बनविण्यात आलेल्या रस्त्यांवर खोदकाम करण्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच मु. जे. महाविद्यालयासमोरील रस्ता तीन महिन्यापूर्वीच डांबरीकरण करून नव्याने बनविण्यात आलेला होता. तोच रस्ता आता पुन्हा मु. जे. महाविद्यालयाला नळसंयोजन देण्यासाठी जेसीबीने खोदण्यात आला.

रस्ते निर्मिती व अमृत जलवाहिनी पाणीपुरवठा योजना यातील समन्वय अजूनही शहरात दिसून येत नाही. वारंवार तयार रस्ते शहरात खोदले जात आहे. त्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडण्याचे प्रमाण कमी न होता वाढतानाचा दिसत आहे. अशा कृती वाहतुक आणि नागरिकांच्या दृष्टीने गैरसोय करणाऱ्या ठरतात. तरी देखील यावर कोणताही उपाय अद्याप दिसून आलेला नाही.

अग्रवाल चौफुली ते जिल्हाधिकारी निवास या दरम्यान असलेला मु. जे. महाविद्यालयासमोरील तीन महिन्यांनी खोदण्यात आलेला हा रस्ता रात्रीतून पूर्वी प्रमाणे करण्यात येईल, असे अमृत योजनेचे मक्तेदार कंपनीचे अभियंता यांनी सांगितले आहे.