---Advertisement---
जळगाव जिल्हा राजकारण

एकनाथ खडसेंचा भाजप पक्षप्रवेश रखडण्यामागचं कारण समोर ; काय आहे वाचा..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२४ । ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ खडसेंनी भाजपात पुन्हा घरवापसी करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातमीला आता जवळपास २० दिवस उलटले तरी देखील त्यांचा अधिकृत भाजप प्रवेश काही झालेला नाही. अशातच पक्षप्रवेश का आणि कोणामुळे रखडला याचं कारण आता समोर आलं आहे.

khadse jpg webp

राज्यातील तीन प्रमुख नेत्यांमुळे एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश रखडल्याची माहिती आहे. राज्यात एक कार्यक्रम घेऊन एकनाथ खडसेंना सोबत घ्या, असं केंद्राकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, तरीही अद्याप एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त काही ठरलेला नाही. यादरम्यान, राज्यातील तीन वरिष्ठ नेते खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत उदासीन असल्याची माहिती आहे.

---Advertisement---

एकनाथ खडसेंना आताच भाजपमध्ये घेतलं तर निवडणुकांमध्ये गटातटाचं राजकारण सुरु होईल. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचा भाजप प्रवेश व्हावा, अशी भूमिका राज्यातील भाजपच्या नेत्यांनी घेतल्याची माहिती आहे.तर एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत कोणीही आडकाठी केलेली नाही. केंद्राने जर निर्णय केला आहे, तर त्यामध्ये राज्य काहीही आडकाठी करत नाही, केंद्र समिती अंतिम निर्णय घेईल., त्या समितीच्या बैठकीनंतर पक्ष प्रवेशाचा निर्णय होईल.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---