⁠ 
शनिवार, मार्च 30, 2024

स्वातंत्र्य, समता व बंधुता हे तत्व नागरिकांच्या वर्तन व्यवहाराचा पाया बनला पाहिजे : डॉ.संतोष राऊत

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ डिसेंबर २०२१ । संविधानातील स्वातंत्र्य, समता व बंधुता हे तत्व नागरिकांच्या वर्तन व्यवहाराचा पाया बनला पाहिजे. असे प्रतिपादन डॉ.संतोष राऊत उर्फ मैत्रीवीर नागार्जुना यांनी केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या डॉ.आंबेडकर विचारधारा विभागाच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक शास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.अजय पाटील हे होते.

पुढे बोलतांना डॉ. राऊत म्हणाले की, बाबासाहेबांनी देशातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांना स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय यांची तरतुद करून विकासाची समान संधी उपलब्ध करून दिली. मात्र काही जण बाबासाहेबांना संकुचित करू पाहत आहेत. बाबासाहेबांना अपेक्षित असलेला भारत निर्माण करण्याचा निर्धार केला जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रारंभी विभाग प्रमुख प्रा. अनिल डोंगरे यांनी प्रास्ताविक केले. हर्षल पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ.विजय घोरपडे यांनी सुत्रसंचालन केले तर आभार अरूण अवसरमोल यांनी मानले.