---Advertisement---
मुक्ताईनगर जळगाव जिल्हा

सोमवारपासून सकाळच्या सत्रात भरणार जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शाळा !

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२३ । उन्हाच्या उकाड्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. अश्यावेळी शाळा सकाळच्या सत्रात भराव्यात अशी मागणी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यानुसार शिक्षणाधिकारी यांनी मागणीचा विचार करून सोमवारपासून जिल्हा परिषद शाळा सकाळच्या सत्रात भरण्यास मंजूरी दिली आहे.

school going children

पाऊस लांबणीवर गेल्याने उन्हाची प्रचंड तीव्रता आहे. नुकत्याच सुरू झालेल्या शालेय सत्रात दुपारची शाळा ही विद्यार्थ्याच्या शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने चिंताजनक ठरणार होती. त्यामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांनी समय सूचकता दाखवत दुपारी ११ ते सायं ५ वाजेपर्यंत भरणारी शाळा यात विद्यार्थ्यांना उष्माघात तसेच प्रचंड उकाड्याने लाही लाही होत आरोग्याची समस्या निर्माण झाल्यास याला जबाबदार कोण ? असा खडा सवाल उपस्थित करून सदरील शाळा सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत भरविण्यात यावी अशी लेखी मागणी केली होती.

---Advertisement---

त्यानुसार म.शिक्षणाधिकारी प्राथमिक,जिल्हा परिषद जळगाव यांनी जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच जि.प प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक यांना हस्त लिखित आदेश काढून सोमवार दि.१९ जून २०२३ पासून सर्व जिल्हा परीषद (प्राथमिक शाळा) सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत भरविण्यात याव्यात असे हस्त लिखित आदेशान्वये सूचित केले आहे

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---