⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

महाज्योती आयोजित ‘तृतीय रत्न’ या नाटकाचा १७ रोजी जळगावात प्रयोग

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२२ । देशातील नागरिकांवर आजही काही प्रमाणात अंधश्रेद्धेचा पगडा कायम असून तो दूर करण्यासाठी महात्मा फुले यांनी लिहिलेलं तृतीय रत्न हे नाटक महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले व संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) या संस्थेच्या नाशिक विभागाच्या वतीने लोकजागृती संस्था प्रस्तूत महात्मा फुले लिखित ‘तृतीय रत्न’ या नाटकाचा प्रयोग दि.१७ रोजी सायंकाळी ७.३० वाजता शहरातील श्री.छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात आयोजन करण्यात आले आहे.

महाज्योती संस्थेच्या वतीने महाराष्ट्रभर जनजागृतीच्या उद्देशाने महात्मा फुले यांनी लिहिलेल्या तृतीय रत्न या नाटकाच्या प्रयोगांचे नागरिकांसाठी मोफत आयोजन करण्यात आले आहे. सर्व फुले प्रेमी बांधवांनी व भगिनींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आ.भा समता परिषदेच्या वतीने करण्यात येत आले आहे.