पती पत्नीचा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या व्यक्तिचिच झाली हत्या !

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२३ । पती पत्नीचा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीची हत्या करण्यात आली असल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. यावेळी एक जण जखमी देखील झाला आहे. या घटनेप्रकरणी धरणगाव पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

murder raver

बिसन भोडा नरगावे (वय ४०)असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. धरणगाव तालुक्यातील वराड बुद्रुक येथील रामजी ऑईल मिल मधे काम करणारा मजूर नजरीया शुभाराम कुमारीया हा त्याची पत्नी बानुबाई सोबत वाद घालून शिवीगाळ करत होता. पती पत्नीमधील मोठमोठ्याने सुरु होता. गोटू भोडू नरगावे हा त्यांचा वाद मिटवण्यासाठी आला.

आमच्या पती पत्नीच्या वादात तु का पडतो असे म्हणत नजरीया कुमारीया याने गोटू नरगावे याला दारुच्या नशेत मारहाण सुरु केली. गोटू नरगावे याला होत असलेली मारहाण बघून बिसन नरगावे हा त्याचा बचाव करण्यासह पुढे आला. मात्र वाद मिटण्याऐवजी बानुबाईचा पती नजरीया याने बिसन नरगावे याला विटेने मारहाण सुरु केली. बिसन याच्या डोक्यावर, तोंडावर आणि छातीवर मारहाण झाल्याने बिसन हा गंभीर जखमी झाला. त्याला शासकीय विद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now