जळगाव लाईव्ह न्यूज । पर्यावरण आणि पृथ्वीसाठी आपली कलात्मक बांधिलकी जपत, थिएटर ऑफ रेलेव्हन्स ‘द… अदर वर्ल्ड’ हे नाटक रविवार 12 ऑक्टोबर 2025 रोजी, सायंकाळी 5.30 वाजता, स्व. भैय्यासाहेब गंधे नाट्यगृह, ला. ना. हायस्कूल, जळगाव येथे प्रस्तुत होणार आहे.

माणूस पंचमहाभूतांपासून बनला आहे. विकासाने माणसाची दृष्टी इतकी भ्रष्ट केली आहे की माणूस स्वतःच्या पंचमहाभूतांशीच युद्ध करत आहे. ही साधीशी गोष्ट हा सुशिक्षित समाज समजू शकत नाही की स्वतःच्या पंचमहाभूतांशी युद्ध करून तो जिवंत राहू शकणार नाही.

पर्यावरण, इकोलॉजीला जपण्यासाठी, संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. थिएटर ऑफ रेलेव्हन्स जीवन वाचवण्यासाठी कटिबद्ध आहे. याच अनुषंगाने थिएटर ऑफ रेलेव्हन्सतर्फे द… अदर वर्ल्ड हे नाटक सादर करण्यात येणार आहे. नाटकाचे लेखन व दिग्दर्शन मंजुल भारद्वाज यांनी केले आहे. अश्विनी नांदेडकर, साचली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के, प्रियंका कांबळे, नृपाली जोशी, तनिष्का लोंढे, प्रांजल आणि अन्य कलाकार यात सहभागी होणार आहेत.
स्व. भैय्यासाहेब गंधे नाट्यगृह, ला. ना. हायस्कूल, जळगाव येथे १२ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५.३० वाजता सादर होणाऱ्या नाटकासाठी उपस्थितीचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी कोमल खामकर 9653691401, प्रियंका कांबळे 9004017440 यांच्याशी संपर्क साधावा.












