सौखेडासिमच्या अंगणवाडीचे होत असलेले बांधकाम निकृष्ठ दर्जाचे
जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२१ । सौखेडासिमच्या अंगणवाडीचे होत असलेले बांधकाम निविदा प्रमाणे होत नसुन अंत्यत निकृष्ठ प्रतिचे होत आहे तक्रार यावल ( प्रतिनिधी ) तालुक्यातील सौखेडासिम येथे जिल्हा परिषदच्या लाखो रुपयांच्या निधीतुन अत्यंत निकृष्ठ अंगनवाडीचे सुरू असलेले बांधकाम तात्काळ थांबवुन कामाची चौकशी करावी अशी मागणी सुनिल भालेराव यांनी यावल पंचायत समितीचे गटविकास यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात सौखेडासिम येथे सुमारे १० लाख रुपयांच्या जिल्हा परिषदच्या निधी तुन बांधण्यात येत असलेले आंगणवाडीचे बांधकाम हे शासनाच्या निविदा व अंदाजपत्रका प्रमाणे होत नसल्याची तक्रार दिली असुन, दरम्यान सुनिल भालेराव यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की , सदरचे आंगणवाडी बांधकामासाठीच्या गढयांची खोलाई केलेली नसुन जमीन लेव्हला पिसिसी केलेली नाही , शासनाने नमुद केलेल्या अंदाजपत्रका प्रमाणे बांधकामात विटा आणी सिमेन्ट वापरण्यात आलेल्या नाही यामुळे बांधण्यात येत असलेली आंगणवाडीची खोली ही १० लाख रुपये निधीतुन बांधण्यात आलेली खोली ही निव्वळ ३ते ४ लाख रुपया पर्यंत करण्यात आले असल्याचा प्राथमिक अंदाज लावण्यात येत असुन, शासनाच्या १० लाख रुपयांच्या मंजुर निधीच्या अर्ध्याच पैशातुन बांधण्यात येत असलेले बांधकाम हे अत्यंत निकृष्ठ प्रतिचे होत असुन, भविष्यात ही निकृष्ठ प्रतिची बांधलेली खोली कोसळल्यास या ठीकाणी मोठया प्रमाणावर जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी यावल पंचायत समितीच्या वतीने तात्काळ हे बांधण्यात आलेले अंगणवाडी खोलीचे बांधलेले निकृष्ठ बांधकाम पाडण्यात येवुन त्या ठीकाणी नव्याने त्याच ठेकेदाराकडुन शासनाच्या निविदा व अंदाजपत्राका प्रमाणे बांधण्यात यावे अशी मागणी सुनिल भालेराव यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना केली असुन , सदरची कार्यवाही न झाल्यास आपण लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा ईशारा ही सुनिल भालेराव यांनी दिला आहे . दरम्यान जिल्हा परिषदच्या बांधकाम विभाग उप अभीयंता यांनी दिनांक १५ सप्टेंबर रोजी या कामाचे मुळ ठेकेदार यांना ग्रामपंचायत सौखेडासिमच्या ठरावानुसार सदरचे अंगणवाडीचे निकृष्ठ होत असल्याचे ठराव घेतल्याच्या अंनुषगाने तात्काळ सदरचे बांधकाम निकृष्ठ कामाचे निरास:न होत नाही तो पर्यंत बांधकाम बंद ठेवण्याची नोटीस पाठविण्यात आल्याची माहीती प्राप्त झाली आहे .